ठळक बातम्या

    पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐

    पालघर :कर्तव्याच्या ठिकाणीच सरप्राईज वाढदिवस; पोलीस निलेश पाटील यांचा पालघर नागरिक परिवाराकडून अनोखा सन्मान 🎂💐

    पालघर हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रण करत असतानाच केक कापून केला वाढदिवस साजरा.

    पालघर | ४ सप्टेंबर २०२६
    पालघर शहरातील वर्दळीच्या हुतात्मा चौकात वाहतूक नियंत्रणाची ड्युटी बजावत असलेले पोलीस निलेश पाटील यांचा वाढदिवस यंदा काहीसा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशीही निलेश पाटील हे आपली ड्युटी सोडून न जाता वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते.याच वेळी पालघर नागरिक संपादक आणि नव भारतीय वाहतूक सेना परिवाराने त्यांना अचानक सरप्राईज देत त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणीच वाढदिवस साजरा केला.पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी असो, हुतात्मा चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी सतत रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात. निलेश पाटील हे देखील सातत्याने हुतात्मा चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावताना दिसतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा आणि कर्तव्याप्रती असलेल्या बांधिलकीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    यावेळी संपादक ‘पालघर नागरिक’ आणि ‘नव भारतीय वाहतूक सेना’ यांच्या वतीने दोन वेगवेगळे केक आणण्यात आले. निलेश पाटील यांना अचानक सरप्राईज देत केक कापण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या ड्युटीच्या ठिकाणीच सहकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून मिळालेल्या या अनोख्या शुभेच्छांमुळे निलेश पाटील यांचा वाढदिवस विशेष ठरला.

    या प्रसंगी पालघर नागरिकचे संपादक तसेच नव भारतीय वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद मजीद लुलानिया, युसुफ सय्यद, अर्पिता तिवारी, अफरोज खान, मयंक बाचपय, सुजल जोशी, जावेद मेमन, अब्दुल शेख, शोएब डीला उर्फ मामू तसेच पालघर नागरिक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

    यावेळी उपस्थितांनी निलेश पाटील यांच्या कर्तव्याचे कौतुक करत “ड्युटीवर असतानाही नागरिकांच्या वाहतुकीसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या निलेश भाऊंच्या सेवेला मनापासून सलाम”, अशा भावना व्यक्त केल्या.ईश्वर,अल्लाह तआला निलेश पाटील यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि तंदुरुस्ती देवो. त्यांच्या परिवाराला सुख-समृद्धी लाभो आणि संपूर्ण पोलीस विभागावर ईश्वराची कृपा सदैव राहो. जनतेच्या सेवेसाठी त्यांना अशीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहो, अशी मनःपूर्वक सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.

    कर्तव्याच्या ठिकाणी मिळालेल्या या अनोख्या सरप्राईजमुळे निलेश पाटील यांचा वाढदिवस ठरला अविस्मरणीय! 🎂💐

    पालघर नागरिक परिवाराच्या वतीने निलेश भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *