ठळक बातम्या

    सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 2,150 रुपयांनी स्वस्त, पण चांदी पुन्हा महागली! आजचे भाव जाणून घ्या

    Oplus_16908288

    सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; 2,150 रुपयांनी स्वस्त, पण चांदी पुन्हा महागली! आजचे भाव जाणून घ्या

     

    सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या बाजारभावाची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे, तर चांदीच्या दराने पुन्हा तेजी पकडली आहे. बुधवार दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात तब्बल 2,150 रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 1.58 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आला. दुसरीकडे, मागील दोन सत्रांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली.

    सोनं किती स्वस्त झालं?

    ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 2,150 रुपयांनी घसरून 1,58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

    याआधीच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 1,60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदवण्यात आली आहे.चांदीच्या दराने पुन्हा घेतली उसळी सोन्याच्या दरात घसरण होत असताना चांदीने मात्र पुन्हा तेजीचा मार्ग धरला आहे. दोन व्यवहार सत्रांपर्यंत दर स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या किमतीत आज 600 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर चांदीचा भाव 2,41,100 रुपये प्रति किलो झाला आहे.

     

    सोनं स्वस्त आणि चांदी महाग का झाली?

    आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोर संकेतांचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात होणाऱ्या हालचालींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येतो. त्यामुळे दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र, चांदीने याउलट कामगिरी करत तेजी नोंदवली.

     

    प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर

    नवी दिल्ली: 24K सोने ₹1,52,360 | 22K सोने ₹1,39,663 | 18K सोने ₹1,14,270 | चांदी ₹2,35,740 प्रति किलो

    मुंबई: 24K सोने ₹1,52,620 | 22K सोने ₹1,39,902 | 18K सोने ₹1,14,465 | चांदी ₹2,36,140 प्रति किलो

    पाटणा: 24K सोने ₹1,52,540 | 22K सोने ₹1,39,828 | 18K सोने ₹1,14,468 | चांदी ₹2,36,190 प्रति किलो

    जयपूर: 24K सोने ₹1,53,340 | 22K सोने ₹1,39,395 | 18K सोने ₹1,14,505 | चांदी ₹2,36,310 प्रति किलो

    कानपूर: 24K सोने ₹1,52,517 | 22K सोने ₹1,40,181 | 18K सोने ₹1,14,110 | चांदी ₹2,36,920 प्रति किलो

    लखनऊ: 24K सोने ₹1,52,470 | 22K सोने ₹1,39,181 | 18K सोने ₹1,14,603 | चांदी ₹2,36,150 प्रति किलो www.mumbaiawaaz.asia

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *