उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना शिवसेना आमदार विलास तरे यांच्याकडून शुभेच्छा!

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार विलास तरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने महायुतीच्या वतीने सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या जलविहार बँक्वेट हॉल येथे आमदार तरे उपस्थित राहिले.

या भेटीत आमदार विलास तरे यांनी राज्यपालांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, “देशाच्या सर्वोच्च पदासाठी होत असलेली ही निवडणूक ही भारताच्या लोकशाहीची मोठी परंपरा दर्शवणारी प्रक्रिया आहे. अशा प्रक्रियेत महाराष्ट्राचा सहभाग आणि मार्गदर्शन ही अभिमानाची बाब आहे,” असे मत व्यक्त केले.

महायुतीच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत औपचारिक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वांचे आभार मानत, भारतीय लोकशाहीची समृद्ध परंपरा आणि केंद्र-राज्य यांच्यातील सहकार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

उपराष्ट्रपतीपद हे देशाच्या घटनात्मक चौकटीतील दुसरे सर्वोच्च पद असून, राज्यसभेचे सभापतीपदही उपराष्ट्रपतींकडेच असते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रातील महायुती आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून आमदार तरे यांनी दिलेल्या शुभेच्छा या महाराष्ट्राच्या वतीने दिलेल्या सद्भावनांचा प्रतीक असल्याचे मानले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *