मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून ईद -ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा…

मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून ईद -ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा…
पालघर नागरिक न्यूज सहसंपादक अमीन मेमन..

दि.५/९/२०२५

रोजी ईद-ए मिलादुन्नबी म्हणजे मुस्लिम धर्मियांसाठी खूपच आनंद साजरा करण्याचा दिवस आहे कारण या दिवशी पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्मदिवस मोहम्मद साहेबांबद्दल व त्यांच्या चांगल्या विचारांबद्दल लिहिण्यासारखे खूपच काही आहे त्यांनी कायम मानवते बद्दल प्रचार केला आहे जगात सर्वात मोठा धर्म मानवता असून जात-पात हे सगळे माणसांनी घडवून आणलेले आहे त्यांच्या विचारान पैकी एक विचार आपण पोट भरून अन्न खात असू व जर आपला शेजारी भुकेचा असेल तर आपल्यातला मनुष्य धर्म संपलेला आहे आपला शेजारी कोणत्याही जातीपंथाचा असो परंतु तो जर भुकेचा असेल व आपण त्याला अन्नापासून वंचित ठेवले तर आपल्यासारखा पापी कोणी नाही त्यांनी कायम मिळून राहण्याची व एक दुसऱ्याचा आदर करण्याची कायम शिकवण दिलेली आहे अशा प्रकारचे भरपूर चांगले संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहेत आज अशा महान व्यक्तीचा जन्मोत्सव म्हणजेच तो खूपच आदर भावनेने मिळून मिसळून आनंदात साजरा करण्याचा दिवस आहे तरी पालघर जिल्ह्यातील कुडूस हे शहर सर्वधर्मसमभाव या गोष्टी मुळे ओळखला जातो

कुडूस शहरामध्ये सर्वधर्मीय मिळून मिसळून सर्व सन् साजरा करतात गणेश उत्सव असो दिवाळी असो किंवा रमजान ईद – ए मिलादुन्नबीअसो एक दुसऱ्यांच्या घरी जाऊन कायम शुभेच्छा देण्याची प्रत आमच्या कुडूस शहरामध्ये आहे कायम जातीय सलोखा ठेवून सर्व सण साजरे केले जातात आज ईद – ए मिलादुन्नबी या सणानिमित्त मा. उपविभागीय अधिकारी जव्हार श्री. समीर महेर साहेब व वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत कुडूस दूर क्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक श्री. भगवंत चौधरी साहेबांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईद – ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या आजचा ईद – ए मिलादुन्नबी चा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने खूपच चांगले सहकार्य केले त्याबद्दल मी अमीन मेमन समाजसेवक व पत्रकार पोलीस प्रशासनाचे आमच्या मुस्लिम  बांधवांकडून आभार मानतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *