सातपाटी दांडीपाडा परिसरात कंटेनर आढळले; पोलिसांची तातडीने कारवाई..
पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे शिरगाव-ऊसभाव व मौजे सातपाटी दांडीपाडा गाव परिसरात दिनांक 07/09/2023 रोजी सकाळी 09.00 वा. सुमारास स्थानिक मच्छीमार बांधवांनी तीन कंटेनर समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर आल्याची माहिती सातपाटी पोलिसांना दिली.
माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी पाहणी करून कस्टम विभाग, कोस्ट गार्ड विभाग, एम.एम.बी. वनविभाग तसेच इतर संबधित विभागांना अवगत करून घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदर कंटेनर मध्ये ॲाईल सदृश्य पदार्थ असल्याचे निदर्शनास आल्याने ते लिक होवुन समुद्री जीवास धोका होवु नये याकरीता भरती-ओहोटीच्या अंदाजानुसार क्रेनच्या सहाय्याने एक कंटेनर सुरक्षितपणे किनाऱ्यावर हलविण्यात आले असून, उर्वरित दोन कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
सदर घटनास्थळी पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख भापोसे यांनी भेट दिली असुन त्याचे मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि उध्दव सुर्वे इतर संबंधित विभागाचे मदतीने कार्यवाही करीत आहेत.



