पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नागरिकांचा मोठा प्रश्नचिन्ह.

📰 पाट 2
पालघर नागरिक न्यूज |
पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नागरिकांचा मोठा प्रश्नचिन्ह.

दिनांक: 10 सप्टेंबर 2025 | पालघर

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुटखा, गांजा, गावठी दारू आणि मटका यांसारखे अवैध धंदे वाढत चालले आहेत. प्रशासनाकडून कडक बंदी असूनही या धंद्यांना पाठीशी घालणारे काही लोक खुलेआम काम करत असल्याचे चित्र समोर येत आहे.

☑काही दिवसांपूर्वी मनोर येथे पूर्ण गाडीभर गुटखा चोरीस गेला होता. यामध्ये गुटखा वाहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी गुटखा चोर आणि माल अद्याप हाती लागलेले नाहीत.

☑ स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गुटखा विक्रीचे व्हिडिओ, गांजा विक्रीचे पुरावे, गावठी दारू व मटका व्यवसायाची ठोस माहिती लवकरच प्रशासनाला दिली जाणार आहे.

❗ नागरिकांचे म्हणणे आहे की “आम्ही समाजाच्या सुरक्षिततेसाठी, तरुण पिढीच्या भवितव्यासाठी हे सर्व पुरावे उघड करणार आहोत. प्रशासनाने जर यावर तत्काळ कार्यवाही केली नाही, तर आमच्याकडे असलेले सर्व व्हिडिओ आणि पुरावे जनतेसमोर आणले जातील.”

प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, हीच सर्वसामान्यांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *