पार्ट 3.महाराष्ट्र सरकारने गुटख्यावर पूर्ण बंदी आणलेली आहे.

पालघर नागरिक स्पेशल रिपोर्ट | पालघर जिल्हा

दिनांक : 11 सप्टेंबर 2025

 पार्ट 3.महाराष्ट्र सरकारने गुटख्यावर पूर्ण बंदी आणलेली आहे. पण तरीसुद्धा पालघर जिल्हा आणि गुजरात सीमेवरील तलासरी भागातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो आहे.

 

 

तलासरी बॉर्डर हा महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे. इथून रोज गुटख्याच्या गाड्या येतात आणि पालघर जिल्ह्यातील गावोगावी, शहरात, अगदी पान टपरीपासून हॉटेलपर्यंत सर्वत्र गुटखा खुलेआम विकला जातो.

 

माननीय पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक सतीश देशमुख साहेब आणि कलेक्टर इंदूरराणी मॅडम, प्रश्न असा आहे की –

👉 जर महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी आहे, तर हा गुटखा बॉर्डर ओलांडून आत कसा येतो?

👉 एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होतो आहे, यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?

👉 जेव्हा आपण पालघरात रुजू झालात तेव्हा हा सगळा धंदा थांबला होता, पण आता पुन्हा उघड्यावर गुटखा विक्री सुरु झाली आहे, हे कसं शक्य आहे?

 

हे लोकांसाठी मोठं आश्चर्य आहे. शासनाची बंदी असूनही गुटखा उपलब्ध आहे म्हणजे पोलिस प्रशासन, अन्न व औषध विभाग, पालघर यांच्या दुर्लक्षाकडे बोट जाते.

 

जनतेची मागणी :

👉 तलासरी बॉर्डरवर कडक कारवाई करावी.

👉 गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत.

👉 प्रशासनाने गुटखा, गांजा, मटका आणि बेटिंगवर कठोर पावले उचलावीत.

 

लोकांना विश्वास आहे की एसपी साहेब आणि कलेक्टर मॅडम या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील आणि कठोर कारवाई करतील.

 

✍️ रिपोर्टर : जावेद लूलानिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *