पालघर नागरिक स्पेशल. रिपोर्ट | दिनांक : 19 सप्टेंबर 2025
पालघर – जिल्ह्याचे मुख्यालय असूनही “बेवारस” का दिसतेय पालघर?
पालघर हे जिल्ह्याचे कलेक्टर मुख्यालय, तसेच एसपी मुख्यालय आहे. सर्व विभाग येथे असूनही शहराची अवस्था बिकट आणि दयनीय आहे.
पालघर नगरपरिषद पूर्णपणे निष्क्रिय – शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत.
जगा-जागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
औषध फवारणी नाही – डासांचा त्रास प्रचंड वाढला आहे.
नागरिक डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांनी त्रस्त होत आहेत.
अवैध धंद्यांचे साम्राज्य:
पालघर शहरात खुलेआम गुटखा विक्री
पूर्व गांधी नगर भागात गांजा, गर्दा, गावठी दारू,मटका व जुगार उघड्यावर सुरूप्रश्न : पोलीस पकडतात आणि मग सोडतात का?
नागरिकांचा थेट सवाल:
माननीय नवे एसपी सतीश देशमुख साहेब आणि माननीय कलेक्टर मॅडम,
या सगळ्या प्रकाराकडे आपण डोळेझाक का करता आहात?
आमच्याकडे सर्व पुरावे आहेत.
आपण तातडीने कारवाई कराल का?
पालघरकरांना अपेक्षा आहे की, जिल्हा मुख्यालयाला खऱ्या अर्थाने “जिल्ह्याची शान” बनवण्यासाठी प्रशासन जागे होईल आणि त्वरित ठोस कारवाई करेल.
✍ रिपोर्टर : जावेद लूलानिया. 8806247860.
“कलेक्टर-एसपी मुख्यालय असूनही पालघर बेवारस!”



