पालघरमध्ये रक्तचंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | दिनांक : 20 सप्टेंबर 2025

पालघरमध्ये रक्तचंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश

पालघर तालुक्यातील साखरे गावातील फार्म हाऊस वर वनविभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल १२ कोटींच्या किंमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. हा साठा अंध्रप्रदेश-तेलंगणातून आणला असावा असा संशय आहे.

☑️ मोठा मुद्देमाल जप्त

वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत रक्तचंदनाचे मोठ्या प्रमाणात ओंडके, प्लॅस्टिक पिशव्या व इतर साहित्य जप्त झाले आहे.

☑️ शोधमोहीम सुरू

या प्रकरणातील मुख्य तस्कर व संबंधित व्यक्तींचा शोध वनविभागाने सुरू केला असून, काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

 

☑️ नागरिकांचा सवाल

एवढा मोठा साठा पालघरमध्ये कसा काय पोहोचला?

इतकी मोठी तस्करी कोणाच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकते का?

पोलीस आणि प्रशासनाला याची माहिती नव्हती का?

जनतेची अपेक्षा

पालघर जिल्ह्यात पुन्हा पुन्हा बेकायदेशीर धंदे उघड होत आहेत. नागरिकांची ठाम मागणी आहे की, या मागील खऱ्या माफियांना पकडून कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत.

🌹 पालघरकरांना आशा आहे की, नवे जिल्हा पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेब व प्रशासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील आणि जिल्ह्याला बेकायदेशीर धंद्यांच्या विळख्यातून मुक्त करतील.

 

✍️ रिपोर्टर : जावेद लूलानिया. पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *