*कुडूस शहरांमधील एक ज्येष्ठ जाणकार समाजसेवक हरपला….

पालघर नागरिक न्यूज

कुडूस रिपोर्टर…

अमीन मेमन .

*पालघर जिल्ह्यातील कुडूस शहराचे कायमचे रहिवाशी रिजवान जी पटेल चाचा प्रेमाने लोक त्यांना(बाल चाचा) म्हणत होते.
रिजवानजी पटेल चाचा यांची सर्वधर्मामध्ये कायम प्रेम संबंध कसे टिकून राहतील व आपल्या शहरांमध्ये जातीय सलोखा कायम राहील याचे ध्यान ते कायमच ठेवायचे.
कोणत्याही जाती बिराजदार चा व्यक्ती कोणत्याही कारणाने अडचणीत असेल तर ते कायमच त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते त्याची अडचण दूर करण्याचे कार्य करत होते परंतु आमच्या कुडूस शहरामध्ये दि.२४/९/२५ रोजी अत्यंत दुःखदायक घटना घडली रिजवान पटेल चाचा हे अल्पशा आजाराने निधन पावले त्यांच्या निधनाने कुडूस शहरांमध्ये व परिसरामध्ये दुःखाचे डोंगर पसरले आहे.


रिजवान चाचणा कुडूस शहराच्या विकासाबद्दलची तलमल कायमच असायची सद्यस्थितीत कुडूस ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापित आहे महाविकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ता व सल्लागार रिजवान जी चाचा हे होते.
त्यांनी प्रत्येक महाविकास आघाडीचे कार्यकर्ता असो अथवा कोणीही कुडूस शहरामधील व्यक्ती असो त्यांना कायमच आपसामध्ये मिळून जुळून राहण्याची व सर्वात मोठा धर्म मानवता धर्म आहे तो सगळ्यांनी पाळाला पाहिजे अशी शिकवण दिली आहे परंतु त्यांच्या निधनाने कुडूस शहरांने एक हिरा हरपला आहे असे म्हणता येईल.ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्यादिवशी नवरात्र उत्सव चालू असताना गावदेवी नवरात्र उत्सव मंडळ यांनी सर्व कार्यक्रम रद्द ठेवून रिजवान जी काका यांना खूपच मोठी श्रद्धांजली वाहिली आहे व इतर नवरात्र उत्सव मंडळांनी सुद्धा रिजवान जी काका यांना श्रद्धांजली वाहिले आहे.

त्यांची जागा दुसरा कोणीही सांभाळू शकत नाही परंतु त्यांच्या कुटुंबीयातील त्यांचा पुतण्या नोमान पटेल व त्यांचे नातू सध्याचे कुडूस शहरामध्ये ग्रामपंचायतचे उपसरपंच मुदत सर पटेल यांनी त्यांनी दिलेली शिकवण व हिंदू-मुस्लिम एकता शहरांमध्ये कायम राहील व जातीय सलोखा कायम राहील याचे लक्ष याकडे कायम लक्ष ठेवण्याचे आहे.


रिजवान जी पटेल काका यांना कुडूस व्यापारी संघटना व वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांच्याकडून सुद्धा श्रद्धांजली वाहनात आले व २६/९/२५ शुक्रवार रोजी त्यांच्या दिवसानिमित्त ग्रामपंचायत कुडूस येथील सभागृहामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहनासाठी ११ वाजता कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
मी अमीन मेमन आमच्या पालघर नागरिक न्यूज परिवारातर्फे रिजवानजी चाचा यांना श्रद्धांजली अर्पित करीत आहे..

संपादक: जावेद लुलानिया के साथ

कुडूस रिपोर्टर: अमीन मेमन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *