पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना विशेष सेवा पदक

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना विशेष सेवा पदक

पालघर – गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात कार्यरत असताना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना प्रभावी आळा घालून उल्लेखनीय कामगिरी करणारे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, भापोसे यांना आज, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.

गृह विभागाच्या आदेशानुसार आणि मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. देशमुख यांनी गडचिरोलीत कार्यरत असताना २.५ वर्षांच्या सेवाकाळात कठीण परिस्थितीतही धाडसी नेतृत्व व प्रभावी कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यातील नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

पालघर पोलीस दल व जिल्हावासीयांच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *