पालघर–मनोर में गुटखा माफिया का दबदबा — पुलिस को बदनाम कर रहा है दिलावर!
☑ पालघर | दिनांक: 13 ऑगस्ट 2025
महाराष्ट्रात गुटख्याची विक्री कायद्याने बंद असतानाही, पालघर जिल्ह्यात गुटखा माफियांचे जाळे अजूनही बिनधास्त सुरू आहे.
स्थानिक माहितीप्रमाणे, पालघर व मनोर परिसरातील मुख्य गुटखा पुरवठा “दिलावर” नावाच्या होलसेलरमार्फत होत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, हा माफिया “मला पोलिस प्रशासनाची परवानगी आहे, कोणी काही करू शकत नाही” असे उघडपणे सांगून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतो आहे.
🚆 गुजरातहून रेल्वेमार्गेही पुरवठा!
विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे की, दिलावरचा गुटखा गुजरातहून ट्रेननेही येतो. याबाबत रेल्वे विभागाकडे तक्रार करण्यात आली असली, तरी नागरिकांचा आरोप आहे की येथेही मोठ्या हप्त्यांमुळे कारवाई थांबते.
माहितीनुसार, रेल्वे सीपी साहेबांकडे अधिकृत तक्रार पोहोचली होती, परंतु पालघर रेल्वे अधिकाऱ्यांच्या अहवालात असे काही घडत नसल्याचे नमूद केले गेले. या प्रकरणाचा संपूर्ण पर्दाफाश लवकरच केला जाणार आहे.
❓ मग मुख्य. माफियापर्यंत कारवाई का पोहोचत नाही?
पालघर व मनोरमध्ये गुटखा सहज उपलब्ध.
महाराष्ट्र सरकारकडून बंदी असूनही पुरवठा सुरू.
FIR फक्त किरकोळ विक्रेत्यांवर — मुख्य होलसेलर अजूनही मोकाट.
☑ जनतेचा सवाल एसपी साहेबांना:
“माननीय एसपी सतीश देशमुख साहेब, जर पोलिसांचे आशीर्वाद या प्रकरणात नाहीत, तर एवढा उघडपणे गुटखा विक्री कशी शक्य आहे?
पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्यावर तातडीने कारवाई होणार का?”
⚠ सध्याचे वास्तव:
मनोर व पालघरच्या काही प्रभारी अधिकाऱ्यांकडून कारवाई फक्त किरकोळ विक्रेत्यांपुरतीच मर्यादित असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
परंतु, गुटख्याचे गोदामे व मोठे पुरवठादार मोकाट फिरत आहेत — हीच सर्वांत मोठी खंत



