पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना पालघर नागरिक न्यूजच्या उपसंपादकांची सदिच्छा भेट.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना पालघर नागरिक न्यूजच्या उपसंपादकांची सदिच्छा भेट.

कुडूस – आज, दिनांक १३ ऑगस्ट रोजी पालघर नागरिक न्यूजचे उपसंपादक अमीन मेमन यांनी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. यतिश देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत अमीन मेमन यांनी यतिश देशमुख यांना अलीकडेच प्राप्त झालेल्या विशेष सेवा पदकाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

अमीन मेमन यांनी सांगितले की, “पालघर जिल्ह्यात आपल्यासारख्या धाडसी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यापासून सर्व काळेबाजार आणि बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी लगाम बसला आहे. तसेच, जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळी व्यसनमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, हे आपल्यामुळे शक्य झाले आहे.”

या भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, व्यसनमुक्ती अभियान आणि जनजागृती यांवरही चर्चा झाली. अमीन मेमन यांनी पुढे अशी अपेक्षा व्यक्त केली की, “आपले कार्य असेच प्रेरणादायी राहो आणि लवकरच पालघर जिल्हा पूर्णपणे व्यसनमुक्त व्हावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *