पालघर – माहीम रोडवरील हरणवाडी परिसरात अवैध जनावरांमुळे वाहतूक कोंडी! नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला.
दिनांक: 14 ऑगस्ट 2025
☑ ठिकाण: पालघर माहीम रोड – वलन नाका ते हरणवाडी.
पालघर माहीम रोडवरील वलन नाका ते हरणवाडी दरम्यानचा रस्ता दररोज जनावरांच्या मुक्त संचारामुळे वाहतूक कोंडीत अडकतो आहे. विशेषतः गायी व भैस रस्त्यावर उभी राहून, हळूहळू चालत असल्यामुळे चारचाकी, दुचाकी व मालवाहतूक वाहनांची लांबलचक रांग लागत आहे.
मुख्य समस्या. रस्त्यावर जनावरांची अचानक एन्ट्री, चालकांना गोंधळ व अपघाताचा धोका
जनावरांचे शौच व चिखल रस्त्यावर पडून घाण व दुर्गंधी
माहीम पोलीस स्टेशन व पालघर पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष
पालघर नगरपरिषदेकडून कारवाईचा अभाव स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रस्त्यावर गायी-भैस थांबवून ठेवणे आणि त्यांच्यामुळे होणारी घाण यामुळे केवळ वाहतूक कोंडीच नव्हे तर आरोग्याचाही धोका निर्माण झाला आहे.

💬 नागरिकांची मागणी:
“ज्या मालकांच्या गायी व भैस आहेत, आणि जे रस्त्यावर सोडून देतात, त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच, ही समस्या कायमची दूर करण्यात यावी, अशी पालघर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडे नम्र विनंती.”
✍ रिपोर्टर – अर्पिता तिवारी. पालघ



