☑ केळवे गावात बिबट्या दर्शनाचा दावा – नागरिकांनी सावधानता बाळगा
दिनांक: 13 ऑगस्ट 2025
☑रिपोर्टर.अर्पिता तिवारी. पालघर
पालघर | केळवे गावात रहिवासी हार्दिक सावे यांच्या घराजवळ बिबट्याचा दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बिबट्याचा डोका स्पष्टपणे दिसल्याचे सांगितले जात आहे.
📢 सर्व नागरिकांसाठी आवाहन.रात्री किंवा पहाटे एकटे बाहेर जाणे टाळा.
लहान मुलं आणि पाळीव प्राणी घरात ठेवा.
बिबट्याजवळ जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नका.
त्वरित वनविभाग किंवा स्थानिक पोलिसांना माहिती द्या.
📞 संपर्क: स्थानिक पोलिस. वनविभाग
📝 टीप: प्रशासनाने या व्हिडिओची सत्यता तातडीने तपासावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीवर भरोसा ठेवावा



