“१४ फेब्रुवारी घटना, १६ फेब्रुवारी निवेदन… तरीही कारवाई नाही; पोलीस भूमिकेवर प्रश्नचिन्ह – न्यायासाठी पालघरमध्ये आमरण उपोषण”


पालघर | प्रतिनिधी
दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर येथे घडलेल्या घटनेनंतर संबंधित प्रकरणात दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनाकडे सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी आंदोलनही करण्यात आले होते. त्या वेळी पोलीस प्रशासनाने जावेद लुलानिया, शमीम शेख आणि वनिता बरड यांची तक्रार (उत्तर) लेखी स्वरूपात नोंदवून घेतली होती. तसेच दोन दिवसांत मुकेश दुबे यांना बोलावून चौकशी करू, असे सांगण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटूनही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही किंवा प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी काय कारवाई होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित घटनेनंतर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुकेश दुबे यांनी जीहादी दी प्रवृत्ती के लोग. “आम्ही सर्व व्यापारी, वकील आणि पोलीस प्रशासनाशी( साठगाठ.
सेटिंग ) चर्चा करून गुन्हा दाखल केला” असे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या वक्तव्याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून यामध्ये कितपत तथ्य आहे? पोलीस प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा दबाव आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पालघरचे माननीय पोलीस अधीक्षक (SP) साहेब यांच्याकडून स्पष्ट भूमिका मांडली जाईल का? तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या वक्तव्यांबाबत मुकेश दुबे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, न्याय मिळत नसल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिनांक 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता पालघर येथील कचेरी रोड, शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्यालय, पोलीस विभाग तसेच संबंधित शासकीय विभागांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच उपोषणाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणीही करण्यात आली आहे. आंदोलन शांततामय आणि कायदेशीर मार्गाने करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे…



