ठळक बातम्या

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

📍 #मुंबई |

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

या द्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी वार्षिक दिनदर्शिका बनवून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.

११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा आता कायापालट करण्यात आला असून या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात या शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी असेही निश्चित करण्यात आले.

महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेल्या साहित्य संपदेचा बहुभाषेत अनुवाद करावा. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांनाही सहभागी करून घ्यावे. प्रत्येक मंत्री, विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *