जनतेच्या विश्वासाचे नाव पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब 🌟
आजच्या काळात प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि कर्तव्यनिष्ठेने काम करणे सोपे नाही. पोलीस विभागाची जबाबदारी फक्त गुन्हेगारांवर कारवाई करणे नसून समाजात कायद्याचा धाक आणि सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणेही असते. पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय यतीश देशमुख साहेब हे अशाच अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या कडक पण जनहिताच्या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
माननीय एसपी साहेब यांनी यापूर्वी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. कठीण परिस्थितीत काम करण्याचा त्यांचा अनुभव आज पालघर जिल्ह्यातही स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांनी पालघर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून सामान्य नागरिकांनी कुठेतरी दिलासा आणि सुरक्षिततेची भावना अनुभवली आहे.पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसत आहेत. विशेषतः हायवेवरील अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ट्राफिक व्यवस्थेमध्ये मोठा बदल दिसून येत असून पोलीस विभाग अधिक सतर्कतेने काम करताना दिसत आहे.
हायवे परिसरात सुरू असलेल्या अनेक अवैध हालचाली आणि गैरकायदेशीर धंद्यांवर देखील नियंत्रण आणण्यात आले आहे. विशेषतः मनोर हायवे परिसरात काही संशयित हालचालींवर कारवाई झाल्यानंतर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक मजबूत झाली आहे.आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात पोलीस विभाग अधिक जबाबदारीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सतर्कतेने काम करताना दिसत आहे. जनतेचे म्हणणे आहे की, पोलीस विभागाचे खरे कर्तव्य केवळ कारवाई करणे नाही, तर समाजाला सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे देखील आहे. जेव्हा पोलीस प्रशासन प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपणे काम करते, तेव्हा सामान्य माणूस स्वतःला सुरक्षित समजू लागतो.
पालघर जिल्ह्यात वाढलेल्या पोलीस सक्रियतेमुळे नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विश्वास अधिक मजबूत झाला आहे. अशा प्रामाणिक, दिलदार, धाडसी आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्याच्या जनतेचा सलाम.
🤲 आम्ही अल्लाह तआलाकडे दुआ करतो की माननीय यतीश देशमुख साहेब यांना उत्तम आरोग्य, तंदुरुस्ती, दीर्घायुष्य आणि समाजसेवा करण्याची अधिक ताकद मिळो.
संपादक पालघर नागरिक
जाग महाराष्ट्र न्यूज
“आम्ही नेहमी सत्य दाखवण्याचे साहस करतो.”
चीफ एडिटर – जावेद लुलानिया, पालघर



