ठळक बातम्या

    NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली!

    Oplus_16908288

    पालघर नागरिक | विशेष जनजागृती बातमी….

    NH-48 वर माणुसकीचा मृत्यू! पेल्हारजवळ व्यक्तीचा मृतदेह तासन्तास महामार्गावर चिरडला जात राहिला… सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला, ज्याने माणुसकी जिवंत ठेवली!

     

    दिनांक : 05 ऑगस्ट 2026

    हे लिहिताना मन सुन्न होत आहे. पत्रकार म्हणून अनेक अपघात पाहिले, अनेक मृत्यू पाहिले; पण पेल्हारजवळ NH-48 वर घडलेली ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.प्राथमिक माहितीनुसार, एक व्यक्ती महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यूमुखी पडला. त्यानंतर जे घडले, ते कोणत्याही सुसंस्कृत समाजाला लाज वाटावी असे आहे.

    मृतदेह महामार्गावर तसाच पडून राहिला… आणि भरधाव वेगाने जाणारी वाहने त्याच्यावरून जात राहिली. एका माणसाचे शरीर अक्षरशः चिरडले जात राहिले, त्याचे तुकडे होत गेले… पण ना कोणी थांबले, ना संबंधित यंत्रणा वेळेवर पोहोचली.ही घटना पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर, मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रासमोर घडली. इतक्या वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना घडूनही अनेक तास कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.सलाम त्या ॲम्ब्युलन्स चालकाला!

    या संपूर्ण घटनेत एक नाव कायम लक्षात राहील ॲम्ब्युलन्स चालक सय्यद साहेब.ते जखमी महिलेला उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात असताना त्यांनी रस्त्यावर काहीतरी पडलेले पाहिले. प्रथम त्यांना वाटले की एखादा अपघातग्रस्त असेल; मात्र गंभीर रुग्ण असल्याने ते थांबू शकले नाहीत.रुग्णाला सुरक्षित रुग्णालयात दाखल करून परत येताना त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी गाडी थांबवली.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो एका माणसाचा मृतदेह आहे. 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली.त्यांनी अत्यंत धैर्याने आणि माणुसकी जपत मृतदेहाचे विखुरलेले अवशेष गोळा केले, कपड्यात जमा केले.

    आजही समाजात माणुसकी जिवंत आहे, याचे हे मोठे उदाहरण आहे.हा फक्त अपघात नाही… ही व्यवस्थेची शोकांतिका आहे!या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.महामार्गावर नियमित पेट्रोलिंग होत होते का?अपघातानंतर इतक्या तासांत कोणत्याही अधिकाऱ्याला ही घटना कशी दिसली नाही?टोल वसूल करणाऱ्या यंत्रणांकडे सतत गस्त घालणारी व्यवस्था कुठे होती?

    NHAI, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा नेमके करत काय होत्या?जेव्हा एक मृतदेह तासन्तास महामार्गावर पडून राहतो, तेव्हा ही केवळ निष्काळजीपणा नसून, संपूर्ण व्यवस्थेचे अपयश असल्याचे चित्र समोर येते.

    टोल आम्ही भरतो… पण सुरक्षितता कुठे आहे?

    दररोज हजारो नागरिक टोल भरतात. रोड टॅक्स भरतात. इंधनावर कर भरतात.

    मग त्यांना बदल्यात काय मिळते?

    तुटलेले रस्ते,धोकादायक क्रॅश बॅरिअर,खड्ड्यांनी भरलेला महामार्ग, वेळेवर न पोहोचणारी मदत,आणि अशा हृदयद्रावक घटना.आम्ही अनेक महिन्यांपासून आवाज उठवत आहोत…आमच्या NH-48 माहिती ग्रुप आणि पालघर नागरिक माध्यमातून आम्ही सातत्याने महामार्गावरील खड्डे, तुटलेले डिव्हायडर, अपघात, वाहतूक कोंडी आणि निष्काळजीपणाच्या घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.

    फोटो, व्हिडिओ आणि पुराव्यांसह अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या.

    पण दुर्दैवाने, आजही परिस्थिती बदललेली दिसत नाही.

    जनतेलाही जागे व्हावे लागेल ही बातमी कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर प्रत्येक नागरिकाला जागे करण्यासाठी आहे.आज दुसऱ्याच्या कुटुंबावर दुःख कोसळले आहे… उद्या ते आपल्या घरात येऊ नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे आणि नागरिकांनीही अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती द्यावीएका माणसाचा मृतदेह महामार्गावर तासन्तास चिरडला जात राहिला… यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते?

    पालघर नागरिक..BJP प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना पालघर जिल्हाध्यक्ष. जावेद लुलानिया पालघर..

    “जनहितासाठी… निर्भीड पत्रकारिता.”

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *