ठळक बातम्या

    NEET पेपरफुटीचे तिन्ही Mastermind महाराष्ट्रातले, CBI ने सांगितला ‘पेपर लीक’चा घटनाक्रम; तिघांनी हॉटेल रुमवर…

    Oplus_16908288

    NEET पेपरफुटीचे तिन्ही Mastermind महाराष्ट्रातले, CBI ने सांगितला ‘पेपर लीक’चा घटनाक्रम; तिघांनी हॉटेल रुमवर…

    राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा हवालदार (भौतिकशास्त्र), मनीषा मांढरे (वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र) या तीन विषय तज्ज्ञांचा नीट-यूजी 2026 च्या पेपरमधील प्रश्नांची माहिती फोडण्यात  सर्वात मोठा हात आहे असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने 28 जुलै रोजी विशेष न्यायालयात 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यासाठी पुण्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या सोसायटीतील प्रवेश-नियंत्रण अॅपमधील नोंदी, बायोमेट्रिक माहिती, मोबाइल कॉल डिटेल रेकॉर्ड व लोकेशन विश्लेषणाचा महत्त्वाचा आधार घेण्यात आला आहे.

    गोपनीय विभागातून पेपरमधले प्रश्न बाहेर येण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांच्या खटल्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात सीबीआयने अंतिम दोषारोपपत्र दाखल केले आहे. या 94 पानी दोषारोपपत्रात या तिघांनी एनटीएच्या गोपनीय विभागातील सुरक्षेतील त्रुटींचा कसा फायदा घेतला, याचा सविस्तर उल्लेख आहे. तपासात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत. गोपनीय विभागासाठी स्वतंत्र थेट रेकॉर्डींग कंट्रोल युनीट नव्हतं. त्यामुळे या प्रकरणात आरोपी असलेल्या तज्ज्ञांच्या हालचालींवर कोणाचेही लक्ष नव्हते. प्रवेश आणि बाहेर पडताना झडतीची व्यवस्थाही नव्हती. या त्रुटींमुळे प्रश्नपत्रिका बाहेर जाण्यास संधी मिळाल्याचा सीबीआयचा दावा आहे.

    पी. व्ही. कुलकर्णीने 135 प्रश्न आणि उत्तरे चिठ्ठयांवर लिहिले

    दोषारोपपत्रानुसार, गोपनीय विभागात भाषांतर व पुनर्भाषांतराच्या कामासाठी तज्ज्ञांना कोरे कागद दिले जात होते. याच कागदांचा वापर करून पी. व्ही. कुलकर्णी याने रसायनशास्त्राचे सर्व 135 प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय संक्षिप्त स्वरूपात छोट्या चिठ्ठयांवर लिहिले. त्या चिठ्ठया लपवून त्याने गोपनीय विभागाबाहेर नेल्याचा आरोप आहे. सीबीआयने कुलकर्णी याला या कटाचा मुख्य सूत्रधार म्हटले आहे. सीबीआयच्या तपासात असेही समोर आले की, कुलकर्णी याने तुलनेने सोपे प्रश्न पाठ केले. हॉटेलमध्ये परतल्यानंतर त्याने ते पुन्हा लिहून काढले.

     

    मनीषा मांढरेने पाठ्यपुस्तकांशी प्रश्नांची सांगड घातलीवनस्पतिशास्त्रासाठी इंग्रजी-मराठी भाषांतर आणि प्राणिशास्त्रासाठी पुनर्भाषांतराची जबाबदारी मनीषा मांढरे हिच्याकडे होती. हॉटेलमध्ये परतल्यावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकांतील संबंधित परिच्छेद ती चिन्हांकित करत असे. अनुभवामुळे प्रश्न आणि पाठ्यपुस्तकातील मजकूर यांची सहज सांगड घालता आली, असा सीबीआयचा दावा आहे.मनीषा हवालदार हिनेही ठेवली फिजिक्सच्या प्रश्नांची नोंदभौतिकशास्त्राच्या भाषांतराची जबाबदारी असलेल्या मनीषा हवालदार ही प्रत्येक दिवसाचे काम संपल्यानंतर दिल्लीतील निवासस्थानी परतल्यावर प्रश्नांची संक्षिप्त नोंद करून ठेवत असल्याचे तपासात आढळल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

    पेपर बाहेर कसा गेला? मोडस ऑपरेंडी काय?

    दोषारोपपत्रानुसार, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा हवालदार या आरोपींनी फोडलेली प्रश्नपत्रिका पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे हिने ध्यस्थांद्वारे राजस्थान व हरयाणापर्यंत पोहोचविल्याचा दावा सीबीआयने केला आहे.ही प्रश्नपत्रिका मध्यस्थांच्या साखळीमार्फत मोठ्या आर्थिक मोबदल्यात विकण्यात आली. याच साखळीतून प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याकडे पोहोचली. त्याने एनटीएकडे तक्रार केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

    त्याच त्याच व्यक्तींचा सहभाग

    दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने जप्त साहित्याची तपासणी केल्यानंतर ते नीट-यूजी 2026 च्या विविध प्रश्नसंचांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. लातूर येथील कोचिंग सेंटर चालक शिवराज मोटेगावकर याचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. सीबीआयने म्हटले आहे की, प्रश्नपत्रिका अंतिम करण्याच्या विविध टप्प्यांवर त्याच त्याच व्यक्तींचा सहभाग होता. त्यामुळे नीट-यूजी परीक्षेची संपूर्ण अंतिम प्रश्नपत्रिका एखाद्या व्यक्तीला उपलब्ध होण्याची www.mumbaiawaaz.asia

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *