ठळक बातम्या

    लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताय? मग सावधान व्हा! आता टीसींची संख्या होणार दुप्पट

    Oplus_16908288

    लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करताय? मग सावधान व्हा! आता टीसींची संख्या होणार दुप्पट

     

    लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते, मात्र या लोकल ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. तेव्हा अशाच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिकीट तपासनिसांची म्हणजेच टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. 

    आजच्या घडीला मध्य रेल्वेकडे 1400 तर पश्चिम रेल्वेकडे 1100 तिकीट तपासनीस कार्यरत आहेत. मात्र उपनगरी रेल्वेवरील प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेव्हा प्रवासी संख्येच्या तुलनेत तिकीट तपासनीसची संख्या कमी पडत असल्याने आता रेल्वेने अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषानुसार प्रत्येक एक हजार प्रवाशांमागे एक तिकीट मध्य रेल्वेला 2800 तर पश्चिम रेल्वेला 2300 ते 2400 तिकीट तपासनिसांची आवश्यकता आहे. तेव्हा मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिकीट तपासनिसांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. 

    रात्रीच्या वेळीही पथक तयार करणार :

    रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, तिकीट तपासनीसांची संख्या वाढली तर विनातिकीट प्रवाशांवरील कारवाई अधिक व्यापक करता येऊ शकेल आणि गर्दीच्यावेळी महत्वाच्या स्थानकांवर स्वतंत्र तपासणी पथके तैनात करता येतील.  त्याचबरोबर एसी लोकल, प्रथम श्रेणी, महिला आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यांतील नियमभंगावर सुद्धा अधिक प्रभावीपणे कारवाई करता येईल. तसेच सणासुदीच्या काळात विशेष मोहिमा करता येतील तसेच रात्री तपासणीसाठीही स्वतंत्र पथके उपलब्ध होऊ शकतील. 

    रेल्वेच्या महसुलात सुद्धा वाढ होईल : 

    तिकीट तपासणी ही फक्त दंड वसुलीपर्यंत मर्यादित नाही तर रेल्वेच्या महसूल संरक्षणासाठी महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वे विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करतात. 2 अतिरिक्त टीसी उपलब्ध झाल्यास ही मोहीम अधिक प्रभावी होण्याबरोबरच रेल्वेच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा आहे पश्चिम रेल्वेने 1.8 लाख 3 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. म्हणजे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत किमान 0.2 टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे स्पष्ट होते. सध्या कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण आहे. प्रत्यक्षात सर्व गाड्या आणि सर्व प्रवाशांची तपासणी करणे शक्य नसल्याने विनातिकीट प्रवासाचे वास्तविक प्रमाण यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. www.mumbaiawaaz.asia

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *