वाडा भिवंडी महामार्गावर एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
पालघर नागरिक न्यूज सहसंपादक .. अमीन मेमन यांची बातमी.
पूर्ण महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील सर्वात खडतर महामार्ग म्हणून ज्याची ओळख आहे असा भिवंडी वाडा महामार्ग या रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे हा रस्ता रस्ता नसून मौत का कुवा है या रस्त्यावर गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक नाहक बळी गेलेले आहेत जनतेला या रस्त्यावर निघताना आपला जीव मुठी मध्ये घेऊन निघावे लागते.
या रस्त्यावर आज दि.१७/९/२५ रोजी एका १९ वर्षीय तरुण स्मित पाटील वाडा पीक ला राहणारा…..

नेहमीप्रमाणे ब्लू स्टार कंपनीमध्ये कामाला जात असताना खुपरी येथे मुरली मनोहर हॉटेल समोर एका ट्रक खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे याबद्दल तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही ही खूपच मोठी शोकांकिता आहे त्यातच ईगल कंपनीचा ठेकेदार ज्याला लोकांच्या जीवाची काळजी नसून आपल्या पेमेंटची काळजी असल्याकारणाने खड्डे बुजवायचे सोडून बिल काढण्याच्या मागे लागला आहे…
या दुर्दैवी घटनेला पूर्णपणे ईगल कंपनीचे ठेकेदार व प्रशासन जबाबदार आहे आणखीन किती बळी वाडा तालुक्यातील जनतेला या रोडवर द्यावे लागतील आता तरी या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने प्रशासनाने जागे होऊन या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून व हा रस्ता त्वरित तयार करण्याची कृपा करावी ही विनंती….



