Navratri 2025 Colors List: शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग…

नवरात्रीचा पावन सण यंदा २२ सप्टेंबर २०२५, सोमवारपासून सुरू होत आहे आणि याचा समारोप २ ऑक्टोबर २०२५, गुरुवारी विजयादशमीच्या दिवशी होईल. यंदा नवरात्रीची नवमी १ ऑक्टोबरला साजरी केली जाईल तर अष्टमी ३० सप्टेंबरला साजरी केली जाईल. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी माता दुर्गेच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा-अर्चना केली जाते. याशिवाय प्रत्येक दिवसाचा एक खास रंग असतो. अनेक लोक नवरात्रीत दिवसाप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करतात. चला तर मग जाणून घेऊया शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.

 

नवरात्री २०२५ मधील दिवसानुसार रंगांची यादी:

दिवस १: पांढरा (White)

दिवस २: लाल (Red)

दिवस ३: शाही निळा (Royal Blue)

दिवस ४: पिवळा (Yellow)

दिवस ५: हिरवा (Green)

दिवस ६: राखाडी (Grey)

दिवस ७: नारंगी (Orange)

दिवस ८: मोरपंखी हिरवा (Peacock Green) किंवा जांभळा (Purple)

दिवस ९: गुलाबी (Pink)

 

– अर्पिता तिवारी, पालघर नागरिक न्यूज 24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *