Palghar Update: पालघर आणि मनोरमध्ये खुलेआम गुटखा विक्री!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज:

मनोर – पालघर जिल्हा, दिनांक : 23 सप्टेंबर 2025

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, मनोर आणि पालघर परिसरात गुटखा विक्री जोरात सुरू आहे, जरी राज्यात गुटखाची पूर्ण बंदी आहे.

विशेष माहितीमुळे समोर आले आहे की:

मनोर: सोहेल, गुटखावालांचा शार्प शूटर अरफात भाई,

पालघर: दिलावर नावाचा माफिया

दोन्ही माफिया खुलेआम सांगत आहेत की, “पोलीस आम्हाला नाही पकडू शकत, तसेच लोकल क्राइम ब्रांच देखील आम्हाला पकडणार नाही.”

या विश्वासावरून मनोर आणि पालघर मधील दुकानदार, पान टपऱ्यावाले आणि अन्य ठिकाणी गुटखा विक्री करताना खुलेआम दिसत आहेत.

स्थानिकांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला आहे – “काय पोलीस आणि क्राइम ब्रांचच्या आशीर्वादाने हे धंदे चालत आहेत?”

मनोर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना नागरिकांकडून कडक विनंती करण्यात आली आहे: आपल्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री सुरु आहे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्ही 112 वर कॉल करून या प्रकरणाची खबरदारी घेऊ.

काही दिवसांपूर्वी मनोर आणि पालघर परिसरात गुटख्यांची विक्री ठळकपणे नोंदवली गेली होती. नागरिकांनी पंधरा ते वीस पॅकेट गुटख्यांची खरेदी करून तिचे व्हिडिओ शूटिंग आणि पुरावे जमा केले आहेत.

या प्रकरणाच्या पुढील कारवाईवर लक्ष ठेवले जात आहे. गुटखा विकणारा पकडला गेला, तर संपूर्ण विक्रीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

👉 पालघर नागरिक म्हणतात,

“बघूया, मनोर आणि पालघरमध्ये कोण पकडला जातो आणि कोणाचा पर्दाफाश होतो!”

☑️ 1 जून चा व्हिडिओ टाकण्यात आला आहे…

पालघर नागरिक, पालघर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *