17 ऑक्टोबर 2025
पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया.
जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर
पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत.
अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला.
नागरिकांच्या मते, ही गाडी एका स्वयंघोषित नेत्याची असून अशा लोकांवर ट्रॅफिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही, ही मोठी खंत व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका वाढतो.
स्थानिकांचा प्रश्न स्पष्ट आहे —
👉 “ट्रॅफिक पोलिसांना हे दिसत नाही का?”
🔴 पोलिसांची संख्या कमी असल्याने वाढतेय अडचण.
पालघर शहरात पोलिसांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
पालघर पाचपत्ती परिसरात एकच ट्रॅफिक पोलीस पूर्ण दिवस मेहनत करताना दिसतो.
स्टेशन नाक्यावर दोन पोलीस फक्त वसुलीत मग्न असल्याचे चित्र दिसते.
चार रस्ता परिसरात दोन ते तीन पोलीस सातत्याने ड्युटी बजावत आहेत.
तसेच टेंंभोडे रोड व आंबेडकर चौक येथे पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
यामुळे नागरिकांकडून मागणी होत आहे की,
☑️ “पालघर शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची संख्या वाढवावी आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई करावी.”
जावेद मजीद लूलानिया
जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर.



