पालघर नागरिक ब्रेकींग न्यूज
दिनांक : २३/०१/२०२६
🚨आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर शिरगाव मुख्य रस्त्यावर* *सांडपाणी सुरूच; कायदे–कानूनांचा उघड उल्लंघन (पार्ट – २)
दिनांक २१/०१/२०२६ रोजी शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याबाबत बातमी प्रसिद्ध होऊनही तीन दिवस उलटून गेले तरी सांडपाणी अद्याप बंद करण्यात आलेले नाही. संडासाचे सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर येत असून हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. बाजूलाच मस्जिद असून येथे नमाजी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्व धर्मांचे नागरिक रोज ये-जा करतात. रस्ता घसरडा झाल्याने मोठ्या अपघाताचा धोका कायम आहे.
हे कृत्य केवळ अस्वच्छतेपुरते मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य कायदे, स्वच्छता नियम आणि वाहतूक सुरक्षेच्या नियमांचा उघड उल्लंघन आहे. सार्वजनिक रस्त्यावर सांडपाणी सोडणे म्हणजे मानवी आरोग्याशी खेळ, म्हणजेच इंसानियतसोबत केलेली क्रूर वागणूक आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात टाकणे, ज्येष्ठ नागरिकांना घसरून पडण्याच्या स्थितीत ढकलणे आणि नमाजी बांधवांना त्रास देणे — हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला मान्य होऊ शकत नाही.
दुखद बाब म्हणजे मस्जिदच्या बाजूला राहणारे(चुना वाला) काही लोक हे सांडपाणी रस्त्यावर सोडत असल्याचे सांगितले जात आहे. येथे प्रश्न मज़हबाचा नाही, तर कृत्याचा आहे. कारण इस्लाम स्वच्छता, शेजाऱ्यांचा हक्क आणि मानवतेची शिकवण देतो. अशा घाणेरड्या कृतींना इस्लामची जोड देणे हीच त्या धर्माची बदनामी आहे. त्यामुळे अशा वर्तनाने समाजाची मान खाली जाते आणि “हे कृत्य करणारे लोक इस्लामच्या शिकवणीवर चालत आहेत का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणात शिरगाव ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची गंभीर लापरवाही स्पष्ट दिसून येत आहे. याआधी ११२ वर कॉल करून पोलीस प्रशासनाला घटनास्थळी बोलावून परिस्थिती दाखवून देण्यात आली होती, तरीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मागणी करण्यात येत आहे की संबंधित इमारतीत राहणाऱ्या सर्व व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षाबद्दलही कायदेशीर कारवाई करावी. जर या सांडपाण्यामुळे अपघात, रोगराई किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित इमारत, रहिवासी आणि ग्रामपंचायत यांनाच पूर्णपणे जबाबदार धरावे, अशी कडक मागणी नागरिकांकडून होत आहे.
पालघर नागरिक
मुख्य संपादक : जावेद लुलानिया. पालघर



