ठळक बातम्या

१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा व वाघोबा खिंड परिसरात प्रवेशबंदी; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कडक आदेश.

🚨 प्रशासनाचा इशारा | पालघर नागरिक 🚨

१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा व वाघोबा खिंड परिसरात प्रवेशबंदी; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा कडक आदेश.

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालघरचे उपविभागीय दंडाधिकारी श्री. श्याम मदनुकर यांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार १५ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वांद्री-डेकाळे धरण, तांदुळवाडी धबधबा तसेच वाघोबा खिंडीतील धबधबा परिसरात पाण्याच्या प्रवाहात उतरणे, धोकादायक कड्यांवर जाणे तसेच पर्यटनासाठी प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पावसाळ्यात या ठिकाणी दरवर्षी अपघात, बुडण्याच्या घटना व जीवितहानी होत असल्याने तसेच संभाव्य मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला आहे.प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना आवाहन केले आहे की, १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संबंधित धरण व धबधबा परिसरात जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि स्वतःसह कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

पालघर नागरिक | जाग महाराष्ट्र न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *