पालघर : आर्यन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सुविधा; RO प्लांट व वॉटर कूलर प्रकल्पाचे लोकार्पण.
रोटरी, इनर व्हील, इंटरॅक्ट क्लब व आर्यन एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम; सुमारे १,००० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.पालघर : आर्यन इंग्लिश स्कूल येथील सुमारे १,००० विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या RO प्लांट व वॉटर कूलर प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
हा सामाजिक उपक्रम रोटरी क्लब ऑफ पालघर, रोटरी क्लब ऑफ मुंबई मालाबार हिल, इनर व्हील क्लब ऑफ पालघर, इंटरॅक्ट क्लब ऑफ आर्यन स्कूल आणि आर्यन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने साकारण्यात आला.या प्रकल्पाचे प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन रफिक लुलानिया होते. विशेष म्हणजे, रफिक लुलानिया हे आर्यन इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले, त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान आणि अभिमान व्यक्त केला. आपल्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाळेसाठी काहीतरी योगदान देता आल्याने हा क्षण आपल्यासाठी विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी अध्यक्ष निकिता कोठारी, माजी अध्यक्ष सुरेश डोंगरे, देणगीदार श्री. धैरेश संघवी, अध्यक्ष भूषण सावे, सचिव अमित पाटील,


अध्यक्ष-निर्वाचित रफिक धाडा, माजी अध्यक्ष अजित दुबे, माजी अध्यक्ष अमित आर. पाटील, माजी अध्यक्ष मिलिंद यू. आणि रोटेरियन कुंदन म्हात्रे घुघे सर, तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई मालाबार हिलच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या अध्यक्ष अनुष्री अवॉर्ड, सचिव मृदुला सावे आणि प्रकल्प अध्यक्षा शमिम लुलानिया यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांचेही या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले.आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे, जयंत दांडेकर, किरण पाटील सर, पी. एन. पाटील, कमलेश वरैया, मुख्याध्यापिका सोनार मॅडम, Churi Sir तसेच शाळेच्या संपूर्ण टीमने या प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी सांभाळले उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आयोजन आर्यन स्कूलच्या इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त आणि उत्साहाने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करत आपल्या नेतृत्वगुणांचे प्रभावी दर्शन घडविले.
‘Service Above Self’चा सेवाभावी संदेश
“Service Above Self” या रोटरीच्या सेवाभावी विचाराला अनुसरून साकारण्यात आलेला हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तसेच त्यांच्या दैनंदिन गरजांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.या उपक्रमातून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करता येतात, तसेच समाजातील विविध घटकांनी शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.



