सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’!

📍बोईसर

सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’!

प्रतिक मयेकर

बोईसर | पालघर जिल्ह्यातील सरावली ग्रामपंचायत सध्या राजकीय घडामोडींमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सदस्यांनीही भगवा धारण केला. एवढ्यावरच थांबता कामा नये म्हणून शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनीही भाजपकडे कूच केल्याने स्थानिक राजकारणात भूकंप झाला आहे.

मात्र या सर्व प्रवेशानंतर एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. भाजपमध्ये दाखल झालेल्या सदस्यांच्या घरी थेट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथम दर्शनाला पोहोचले. त्यामुळे गावभर एकच कुजबुज सुरू झाली आहे – “जेव्हा हेच कार्यकर्ते शिवसेनेत होते, तेव्हा कधी दर्शन घ्यायची वेळ आली नाही; मग आता भाजपमध्ये गेल्यावरच एवढा स्नेह का?” असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

यामुळे सरावलीचे राजकारण आता नव्या वळणावर गेले असून गावकरी सरळ भाषेत प्रश्न विचारू लागले आहेत – “हे भक्ती दर्शन आहे की राजकीय दर्शन?” कारण, नुसता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेले असते तर एक गोष्ट होती, पण थेट भाजपमध्ये दाखल झालेल्यांच्या घरी प्रथम दर्शन घेण्यामागचा हेतू नेमका काय, यावर शंका उपस्थित होत आहे.

यातून एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सरावलीमध्ये राजकारण आता “जगदीश धोडी विरुद्ध विलास तरे” या नव्या संघर्षाभोवती फिरू लागले आहे. गावकऱ्यांच्या बोलण्यातून दिसते की, भाजपकडे वाढती झुकते माप पाहून शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यामुळेच, “त्यांच्या पायाखालची वाळू सरकली का?” असा तिखट सवाल सर्वत्र ऐकू येत आहे. राजकारणातील या उलथापालथीमुळे सरावलीत आगामी काळात अधिक धुमश्चक्री होणार हे नक्की. आता मतदारांचा कल नेमका कुणाकडे वळतो, आणि कोणाची गाडी रुळावरून घसरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *