पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी | Palghar News Update

पालघर पोलीसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले २०,४०,०००/- रुपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल केले हस्तगत.

पालघर पोलीस दलाची यशस्वी कामगिरी.

📍 पालघर

भारत सरकारच्या दुरसंचार विभाग निर्मित CEIR (Central Equipment Identity Register) हा राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाने सदर CEIR पोर्टलचे मदतीने २०,४०,०००/- रूपये किंमतीचे एकूण १०४ मोबाईल शोधण्यात यश मिळवीले.

दि.११/०९/२०२५ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे एका विशेष कार्यक्रमात संबंधीत नागरिकांना हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, नवी मुंबई, श्री. संजय दराडे यांनी पालघर पोलीस दलाचे कौतुक करून बोलले की, ‘CEIR पोर्टलच्या योग्य वापरामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढली आहे. पालघर पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे’

तसेच नमूद कार्यक्रमात पालघर पोलीस अधीक्षक, श्री. यतिश देशमुख यांनी या मोहिमेची माहिती दिली. सदरवेळी ते म्हणाले की, ‘तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करून आम्ही मोबाईल शोधून काढले. अनेक दिवसांपासून मोबाईल हरवलेले असल्याने आशा सोडलेल्या नागरिकांना त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले. भविष्यातही पालघर पोलीस दल अशाच प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहील, असे आश्वासनही या वेळी देण्यात आले. सदरवेळी नागरिकांनी त्यांचा मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी पालघर पोलीसांचे आभार व्यक्त केले.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, अतिरिक्त कार्यभार सायबर पोलीस ठाणे, पोउपनि रूपाली वर्तक, पोउपनि/समीर भोसले, पोना/६५६ भुषण वाघमारे, मपोना/१०८६ कविता पाटील, मपोअं/२६१ मोनिका तिडके, पोअं/७७७ रामदास दुर्गेष्ट, पोअं/५७ रूपेश पाटील, पोअं/३४ रोहित तोरस्कर, पोअं/१४६८ अक्षय शेट्ये, पोअं/१५५३ महादेव सांगवे, मपोअं/११७० स्नेहलता ढोरे, मपोअं/५९ स्नेहल शेलार, मपोअं/१६१२ ऋषीका बारी सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी केलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *