NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्ग :निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका, जबाबदार कोण?

दिनांक ११  जानेवारी २०२६

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) हा सध्या अपघातांचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावर वारंवार होणारे अपघात, वाहनांना लागणारी आग, रस्त्यावर तासन्‌तास उभे असलेले खराब ट्रक, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वेळेवर तातडीची मदत न मिळणे—या सर्व कारणांमुळे सामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. हा महामार्ग विकासाचा मार्ग न राहता मृत्यूचा मार्ग ठरत आहे की काय, अशी भीती नागरिकांमध्ये वाढत आहे.
महामार्गावरील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्ता सुरक्षा समिती अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अपघात झाल्यानंतर मदत पोहोचायला उशीर होतो, वाहतूक नियंत्रणाचा अभाव दिसून येतो आणि जबाबदारी कोणाची, हे स्पष्ट होत नाही.

🔴 रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष.

➡️ डॉ. इंदूराणी जाखड मॅडम (पालघर जिल्हाधिकारी)

🔴 जवाबदार प्रशासकीय अधिकारी

➡️ पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक (SP)

➡️ RTO – प्रादेशिक परिवहन अधिकारी

➡️ NHAI चे संबंधित अधिकारी

🔴 लोकप्रतिनिधी

➡️ खासदार – डॉ. हेमंत सावरा

➡️ आमदार – राजेंद्र गावित साहेब

☑️आमदार – विलास तरे साहेब

नागरिकांचा थेट सवाल आहे.

👉 महामार्गावर अपघात होऊन जीव जात असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

👉 टोल वसुली नियमित सुरू आहे, पण प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कुठे आहे?

👉 जनता त्रस्त आहे, तर आपल्या वेदना मांडायच्या तरी कोणाकडे, जर लोकप्रतिनिधींनाच आवाज दिला नाही तर?

आज महामार्गावरून प्रवास करणारी जनता अक्षरशः स्वतःच्या जीवाच्या भरवशावर आहे. लोक हैराण आहेत, कुटुंबे चिंतेत आहेत, पण तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस आणि परिणामकारक कारवाई होत नसल्याची भावना जनतेत आहे. जनतेचा आवाज वरपर्यंत पोहोचला नाही, तर बदल होणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता तरी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांनी तात्काळ कठोर निर्णय घ्यावेत, अन्यथा हा महामार्ग “मृत्यूचा कुवा” ठरेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. आज आवाज उठवला नाही, तर उद्या कधी उठवणार?
कारण — आवाज तर उठवायलाच पाहिजे.

✍️ जावेद म लुलानिया.
मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी
महाराष्ट्र उपाध्यक्ष.
NH-48 इन्फॉर्मेशन ग्रुप,
माझी नगरसेवक पालघर नगर परिषद.पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *