मुंबई-अहमदाबाद महामार्ग – टोलखोरांचे राज्य, नागरिकांचा नरकयात्रा!

वसई सातिवली ब्रिजवर पाणी साचल्याने अपघातांची मालिका – प्रशासनाचे डोळे झाक, नागरिकांचा आक्रोश उसळला!

प्रतिक मयेकर

वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वसई सातिवली ब्रिज हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर डबकं तयार झालं असून अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करतात, पण त्यांना मिळते ती फक्त टोलची पावती आणि धोकादायक प्रवासाची शिक्षा.

महामार्गावरून कोट्यवधींचा टोल वसूल केला जातो. पण त्या मोबदल्यात नागरिकांना मिळते ती केवळ खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती. पावसाळा सुरू झाला की दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते. पण प्रशासन मात्र झोपेत आहे. वाहनं घसरून जीव धोक्यात आला तरी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचा संताप आता उफाळून आला आहे. “टोल वसुलीला आम्ही काहीही म्हणत नाही, पण किमान सुविधा तरी द्या. जीव गेला की जबाबदारी कोण घेणार? आमच्याकडून पैसा घेतला जातो, पण आमच्या सुरक्षिततेला किंमतच नाही का?” – असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.

 

सडक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष अद्याप या समस्येकडे गेलेले नाही. टोलवसुलीचे संगणकीकरण मात्र होते, पण नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. पावसाचे पाणी साचून रस्ता अपघातप्रवण होत असेल, तर हा महामार्ग नागरिकांच्या सुविधेसाठी आहे की फक्त टोलखोरांच्या लुटीसाठी? – असा सरळ प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सरकार आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन सातिवली ब्रिजवरील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टोल वसुली सुरूच आहे, पण सुविधा शून्य – हा सरळसरळ लुटारूपणा नाही तर काय? नागरिकांच्या जीवाशी अजून किती खेळणार हे प्रशासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *