पालघर येथे दिव्यांग बालकांसाठी मोफत ऑर्थोपेडिक तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर

पालघर येथे दिव्यांग बालकांसाठी मोफत ऑर्थोपेडिक तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिर

विष्णू सवरा सामाजिक न्यास, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स (IPOD) मुंबई आणि मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “विकलांगता मुक्त पालघर” या उपक्रमांतर्गत दिव्यांग बालकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, आयर्न हायस्कूलजवळ, पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये पालघर जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. जन्मजात अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी (मेंदू पक्षाघात), जन्मतः हात-पाय वाकडे असणे, कंबरेच्या सांध्यातील विकृती, हात-पायांच्या लांबीतील असमानता, सांधे व हाडांच्या विविध समस्या तसेच चालण्यात होणाऱ्या अडचणी यांसारख्या आजारांवर मार्गदर्शन व आवश्यक उपचारांची माहिती देण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांचे विशेष सहकार्य लाभले असून, प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तरल नागडा व त्यांची टीम तसेच डॉ. जयदीप धमेले हे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.

जिल्ह्यातील गरजू पालकांनी आपल्या बालकांसह या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

9867934469 / 8805746099 / 9970811202 / 8976029494

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *