रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा

रोटरी पिक ऑटो उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा

पालघर :

रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 व रोटरी क्लब यांच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी “रोटरी पिक ऑटो” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना मोफत ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग प्रशिक्षण, लायसन्स, परमिट तसेच आवश्यक कागदपत्रांची मदत देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना स्वतःची ऑटो रिक्षा चालवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पात्र महिलांना कर्जासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार डाउन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना रोजगाराची संधी देणारा आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान, या उपक्रमाबाबत भा.ज.पा. प्रणीत नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद लुलानिया यांनी रोटरी क्लबचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

जावेद लुलानिया म्हणाले की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोटरी क्लबने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केलेली ही एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक सुरुवात आहे. या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे खूप-खूप अभिनंदन व शुभेच्छा.”

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी आयोजकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *