मनोर ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या.*लोकांच्या जीवाशी खेळ *
रिपोर्टर: मनोर रहिवासी
दिनांक: 14 ऑगस्ट 2025
मनोर शहरातील ग्रामपंचायतद्वारे पुरवण्यात येणारे पिण्याचे पाणी अत्यंत खराब स्थितीत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की गटरचे पाणी नळात प्रवेश करत आहे. पाणी येताच ते दूषित असून पिण्यास अपुरे आहे.
गरीब नागरिकांना रोज पाणी उकळवण्याचे साधन नाही.
लोकांना दोन-तीन कपड्यांनी पाणी साफ करून पिणे भाग पडते.
त्यामुळे मनोरच्या रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पाण्याचे आरोग्यसंबंधी महत्त्व.शुद्ध पाणी जीवनासाठी अत्यावश्यक आहे.
दूषित पाणी पिणे आतड्याचे रोग, त्वचारोग, डायरिया, पोटाच्या संसर्गाचा धोका वाढवते.
सुरक्षित पाणी उपलब्ध नसल्यास लोकांचे आरोग्य आणि जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो.
जवाबदार आणि परिस्थिती:
ग्रामसेवक म्हणतो: “मी 2020 पासून येथे आहे, त्यानंतरही अशीच स्थिती आहे. कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेतले आणि काम पूर्ण केले नाही.”
सरपंच म्हणतो. “आमच्याकडे निधी नाही, फिल्टर प्लांट नाही. वर तक्रार केली, पण पैसा वसूल होतो, लोक नळपट्टीचा पैसा वाढवण्यासाठी तयार नाहीत.”
या कारणामुळे पावसाळ्यात पाणी अधिक दूषित होत आहे.
निष्कर्ष: जनता ह्या लोकांना सुरक्षित पाणी मिळावे म्हणून निवडले होते, पण गटरचे पाणी पिण्यास देण्यात येत आहे.
अशा कामचोर ग्रामसेवक आणि निष्क्रिय सरपंचावर तत्काळ कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
पालघर बीडीयो आणि मनोर पोलीस प्रशासन यांना विनंती आहे की या गंभीर प्रकरणाची तपासणी करून कडक कारवाई करावी.
अनुरोध:पाणी पिण्यायोग्य आहे का, याचा ताबडतोब रिपोर्ट तपासला जावा.
दोषींना जबाबदार ठरवून लोकांचे आरोग्य सुरक्षित केले जावे



