“वाऱ्यावर चालणारं प्रशासन — सरावली, बोईसर आणि खैरेपाड्यात ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांचा बेफिकीर कारभार!”
प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली, बोईसर आणि खैरेपाडा या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार पाहिला तर जाणवतं की ग्रामपंचायतींचं प्रशासन हे कचरा उचलण्यापेक्षा जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या घंटागाड्या पाहिल्या की समजतं, ‘स्वच्छ भारत अभियान’ हे फक्त पोस्टरपुरतंच मर्यादित आहे. या गाड्या नागरिकांच्या अंगावर कचरा उडवत धावतात, आणि प्रशासन मात्र गप्प राहून नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी पाहतं….



