मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मोठी बातमी! मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल आहे. पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढील रणनीती आखणं क्रमप्राप्त असणार आहे. कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर, आता…



